रुकडी-माणगाव: माणगाव ग्रामपंचायतींच्या थकबाकीपोटी येथील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कार्यालयातील साहित्य ग्रामपंचायताने जप्त केले. जप्त साहित्य मध्ये कार्यालयातील लोखंडी सह प्लास्टिक खुर्ची, कपाट, तिजोरी, टेबलचा समावेश आहे.
कारवाईचे लेखी नोटीस देवून ही सहाय्यक अभियंता कदम हे वेळेत हजर न झाल्याने कारवाईस विलंब झाला.माणगाव येथील म.रा.वि.वि कार्यालयाकडून स्थानिक करापोटी 16 लाख रू येणे आहे. सदरचे कर भरणे बाबत २०१५ पासून ग्रामपंचायत पाठपुरावा करत आहे. पंरतू विद्युत वितरण कार्यालय सदरचे कर भरणे ऐवजी स्थानिक दिवाबत्तीचे थकबाकी ग्रामपंचायतने भरावे याकरिता तगादा लावला.
विद्युत वितरण कंपनी ग्रामपंचायतचे स्थानिक कर भरणे बाबत असमर्थता दर्शविताच. ग्रामपंचायत विद्युत वितरण कंपनीच्या विरोधात न्यायालयीन दावा दाखल केला होता. यामध्ये न्यायालयाने ग्रामपंचायतीस थकीत कर वसूल करण्याचा अधिकार असल्याचे निरीक्षण नोंदवले होते.