राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील रात्री वर्षा बंगल्यावर दाखल झाले. जयंत पाटील मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेल्यामुळे राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या आहेत. मतदारसंघातील कामांसाठी मुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगल्यावर बोलावल्याची माहिती जयंत पाटील यांनी दिली आहे. या भेटीचा दुसरा कोणताही राजकीय अर्थ काढू नये, असंही जयंत पाटील यांच्याकडून स्पष्ट मुख्यमंत्र्यांच्या भेटीमुळे उलटसुलट चर्चा करण्यात आले.
मागच्या काही काळापासून जयंत पाटील भाजपमध्ये जातील अशा चर्चा सुरू आहेत. जयंत पाटील यांनी मात्र या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. आपण कुठेही जाणार नसून शरद पवारांसोबत राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. एकीकडे जयंत पाटलांबाबतच्या या चर्चा सुरू असतानाच त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यामुळे उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सहकारी बारामती दौऱ्यावर जाणार आहेत. पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी गोविंदबाग निवासस्थानी त्यांना भोजनाचे निमंत्रण दिले होते. याच निमंत्रणासाठी जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचे कळते.
