अजितदादांना गृहमंत्रीपद देणार नाही…..

 शरद पवार आणि अजित पवार यांचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीत आज सरकारचा नमो रोजगार मेळावा पार पडला. या रोजगार मेळाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, शरद पवार, सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवारही उपस्थित होते. सर्वच दिग्गज आणि राजकारणातील एकमेकांचे विरोधक एकाच मंचावर आल्याने या कार्यक्रमाकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. या कार्यक्रमात राजकीय टोलेबाजी रंगेल असं वाटत होतं. पण देवेंद्र फडणवीस वगळता कुणीही राजकीय टोलेबाजी केली नाही. फडणवीस यांनी ही टोलेबाजी केली, पण ती शरद पवार गटाच्या विरोधात केली नाही. तर, फडणवीस यांनी थेट अजितदादांनाच चिमटे काढले. अजितदादा यांना गृहमंत्रीपद देण्यास जाहीरपणे नकारही दिला. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या.