कुणबी दाखले देण्यासाठी येथील तहसील कार्यालयात कोणताही विशेष कक्ष स्थापन करण्यात आलेला नाही .तसेच दाखल्याची माहिती मागायला गेल्याने व्यवस्थित माहिती दिली जात नाही. मराठा समाजाची जाणीवपूर्वक अडवणूक केली जात आहे. दाखले देण्यासाठी कक्ष स्थापन न केल्यास मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते कृष्णाजी मोरे यांनी दिलेल्या अर्जात म्हटले आहे.
राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील जुन्या कोणबी नोंदी शोधून मराठा समाजाला कुणबी दाखले तात्काळ वितरित करण्याचे आदेश दिले आहेत .मात्र येथील तहसील कार्यालयात दाखले देण्यासाठी विशेष विभागच नाही. एखादी व्यक्ती दाखल्याची माहिती घेण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याला गेल्यास अनेक हेलपाटे मारायला लावले जातात. मुख्यमंत्र्यांनी आदेश देऊनही त्याचे अंमलबजावणी केली जात नाही .त्यामुळे तहसीलदारांना आदेश देऊन कुणबी दाखले देण्यासाठी तात्काळ विशेष कक्ष स्थापन करण्यात यावा.