सातारा व सांगली जिल्ह्याच्या सीमेवर शंभर वर्षांपूर्वीचा ब्रिटिशकालीन राजेवाडी तलाव आहे. या तलावामध्ये पाणीसाठा असून शासनाने पाणी उपसा बंद बंदी केली आहे.
राजेवाडीसह परिसरातील शेतकरी अवलंबून असलेल्या आटपाडी तालुक्यातील राजेवाडी तलावातील पिण्याचा पाणीसाठा राखून शिल्लक असणारे पाणी येथील परिसरातील शेतकऱ्यांना आठवड्यातून दोन वेळा मिळावे यासाठी जलसंपदा मंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश द्यावे असा प्रश्न रासपचे माजी मंत्री महादेव जानकर यांनी अधिवेशनामध्ये उपस्थित केला. तर दिघंची मसवड हा रस्ता चौपदरी करावा अशी मागणी केली आहे.