खानापूर विधानसभेचे दिवंगत आ. अनिल बाबर यांच्या निधनानंतर सुहास बाबर यांच्या नेतृत्वाखाली व अमोल बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली रेवानगर (सुळेवाडी) सेवा सोसायटी निवडणूक झाली. स्व. आ. बाबर यांच्या निधनानंतर पहिलीच ही निवडणूक असल्याने अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात होती.
विटा नगरपरिषद हद्दीतील रेवानगर (सुळेवाडी) सर्व सेवा सहकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत शिवसेनेचे युवा नेते व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने १२ विरुद्ध १ अशा फरकाने विरोधकांना धोबीपछाड दिली. त्यामुळे उर्वरित १२ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत स्व. आ. बाबर समर्थक गटाचे सर्वच्या सर्व १२ उमेदवार मोठ्या मताधिक्यांनी विजयी झाले. या निवडणुकीत विरोधी माजी आ. सदाशिवराव पाटील समर्थक गटाची एक जागा बिनविरोध झाली होती.