राज्याचे चौथे महिला धोरण जाहीर…..

आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने राज्याचे चौथे महिला धोरण जाहीर करण्यात आले आहे. याबाबतची माहिती राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी X वर पोस्ट करत दिली आहे.’आंतरराष्ट्रीय महिला दिनी राज्याचे चौथे महिला धोरण लागू करण्यात येतं आहे.

लेक लाडकी योजना, महिला सशक्तीकरण अभियान, मनोधैर्य योजना, महिला सक्षमीकरण केंद्र अशा विविध योजनांतून महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी व सक्षमीकरणासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त करूया.’ असे तटकरे यांनी म्हटले आहे.

विशेष म्हणजे सरकारी आणि खासगी क्षेत्रातील कंपन्यांमध्ये गर्भवती महिलांसाठी घरून कामाला प्रोत्साहन देण्याची शिफारस या धोरणातून करण्यात आली आहे. (International Women’s Day 2024) तसेच यापुढे अधिकृत कागदपत्रांवर आईचे नाव लावणं बंधनकारक होणार आहे