Breaking! मंगळवेढा उपसा सिंचन योजना मंजूर!

गेल्या 50 वर्षांपासून प्रतिक्षेत असलेल्या मंगळवेढा उपसा सिंचन योजनेला अखेर राज्य सरकराने मंजूरी दिली आहे. आज (बुधवार) राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंगऴवेढा उपसा सिंचन याेजनेला मान्यता देण्यात आली आहे.यामुळे कायम दुष्काळी असणाऱ्या 24 गावांना मोठा दिलासा मिळाल्याची भावना आमदार समाधान आवताडे यांनी व्यक्त केली.

आचारसंहितेपूर्वी मंगळवेढा उपसा सिंचन योजनेला मंजुरी द्या अन्यथा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकू असा इशारा राज्य आणि केंद्र सरकराला मंगळवेढा तालुक्यातील कायम दुष्काळी भाग असलेल्या 24 गावातील शेतकरी, ग्रामस्थांनी नुकताच दिला हाेता.या ग्रामस्थांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची भेट घेण्याचे देखील निश्चित केले हाेते. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी देखील शुक्रवारी भेटण्यासाठीची वेळ ग्रामस्थांना दिली हाेती.

दरम्यान आज राज्य मंत्रीमंडळाने मंगळवेढा उपसा सिंचन याेेजनेला मंजूरी दिली आहे. आमदार समाधान आवताडे यांच्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. या निर्णायमुळे कायम दुष्काळी असणाऱ्या 24 गावांना मोठा दिलासा मिळाला आहे.