खानापूरला लवकरच ट्रामा केअर सेंटर…..

घाटमाथ्यावरील खानापूर हे मध्यवर्ती ठिकाण आहे. राष्ट्रीय महामार्ग गेल्यामुळे वारंवार होणारे अपघात व रुग्णांना तातडीने आरोग्य सेवा मिळण्यासाठी विटा किंवा तासगाव, सांगलीला रुग्णाला जावे लागते. हा त्रास बंद होण्यासाठी खानापूर येथे ट्रामा केअर सेंटर सुरू करणे आवश्यक असल्याची बाब मुखमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली.

खानापूर येथे ट्रामा केअर सेंटर करण्याची मागणी राजाभाऊ शिंदे व अनिल शिंदे यांनी आ. अनिल बाबर यांच्याकडे केली होती. त्यांच्या निधनानंतर या कामाचा पाठपुरावा सुहास बाबर यांनी केला. या कामासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्रव्यवहार केला होता.

विटा खानापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात केअर सेंटर सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव आरोग्य संचालकांकडे
मंजुरीसाठी पाठविला असून, तो याबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी आरोग्य उपसंचालकांकडे सादर केला असल्याची माहिती सुहास बाबर यांनी दिली. त्यामुळे आता खानापूर येथे ट्रामा लवकरच मंजूर होऊन खानापूर येथे ट्रामा केअर सेंटर सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचेही सुहास बाबर यांनी सांगितले. त्यामुळे हा प्रस्ताव तातडीने मंजूर करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे.