जनसुरक्षा विधेयकामुळे लोकशाहीने दिलेल्या अधिकारावर गदा येणार असल्यामुळे जनसुरक्षा विधेयक रद्द करावे, या मागणीसाठी इचलकरंजी शहर काँग्रेसच्या वतीने महात्मा गांधी चौकात शंखध्वनी करत परिपत्रकाची होळी करण्यात आली. हे विधेयक रद्द न केल्यास सरकार विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
यावेळी काँग्रेसचे (Congress) प्रदेश सचिव शशांक बावचकर, शहराध्यक्ष संजय कांबळे यांनी शासनाने अदानी कंपनीला मुंबईत जागा दिली आहे. त्या विरोधात जनप्रक्षोभ उसळु नये म्हणून शासनाने जनसुरक्षा विधेयक मंजुर केले आहे. यातून सरकार लोकशाहीचा गळा दाबण्याचे आणि लोकशाहीने दिलेले अधिकार पायदळी तुडवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे हे विधेयक त्वरीत रद्द करावे अन्यथा या विरोधात तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. या आंदोलनात बाबासाहेब कोतवाल, शशिकांत देसाई, प्रमोद खुडे, युवराज शिंगाडे, अजित मिणेकर, रवींद्र पाटील, प्रशांत लोले, ताहीर खलिफा, योगेश कांबळे, अण्णा कांबळे, तौसिफ लाटकर, रवी वासुदेव, सुदाम साळुंखे, प्रमोद नेजे, प्रवीण फगरे, शिवाजी चव्हाण, बिस्मिल्ला गैबान, वेदिका कळंत्रे, चंद्रकांत लोकरे, रवी नवाळे सहभागी झाले होते.
