महायुतीचे कोल्हापूर आणि हातकणंगलेचे उमेदवार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांचे उमेदवारी अर्ज सोमवार, दि. १५ एप्रिल दाखल करण्यात येणार आहेत. या दोघांचाही अर्ज भरताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले.
या दोन्ही उमेदवारांचे अर्ज दाखल करताना मोठे शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी महायुतीने सुरू केली आहे. महायुतीचे जिल्ह्यातील सर्व नेते एकाच व्यासपीठावर येणार असून तसे नियोजन सुरू करण्यात आले आहे. यासाठी प्रत्येक तालुक्यातून कार्यकर्ते उपस्थित राहणार असून पुण्याहून मंत्री चंद्रकांत पाटील हे देखील अर्ज दाखल करताना येणार आहेत.