बसस्थानकातील रस्त्यांचे डांबरीकरण करण्याची मागणी

इचलकरंजी शहरांमध्ये कारखानदार वर्ग मोठा असल्यामुळे वस्त्रनगरी म्हणून जगभर ख्याती आहे. वस्त्र नगरीतील पाण्याचा मुद्दा सर्वांनाच माहिती आहे. अशातच आता इचलकरंजी शहरातील मध्यवर्ती बस स्थानकात ठिकठिकाणी खड्डे पडलेले पहावयास मिळत आहेत. त्यामुळे बस गाड्या खिळखिळ्या झाल्या आहेत.

याच खड्ड्यामधून बसेस जात असल्यामुळे प्रवाशांनाही कंबरदुखी, पाठदुखी यांसारखे त्रास सुरू झाले आहेत. एसटी महामंडळाने बस स्थानक परिसरातील संपूर्ण परिसराचे डांबरीकरण करावे अशी मागणी जोर धरत आहे. त्याचबरोबर बस स्थानकाच्या दोन्ही प्रवेशद्वारावर स्पीडब्रेकर बसविण्यात यावे अशी मागणी शहरवासीयांतून होत आहे.