फक्त सांगलीच नव्हे, तर अवघ्या राज्याचे लक्ष लागून राहिलेल्यासांगली लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून (Maha Vikas Aghadi) ठाकरे गटाचे (Uddhav Thackeray Faction) उमेदवार चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांनी आज (19 एप्रिल) उमेदवारी अर्ज दाखल केला. चंद्रहार पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut), राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil), आमदार सुमनताई पाटील आणि काँग्रेसचे आमदार विक्रम सावंत उपस्थित होते.
सांगली लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून चंद्रहार पाटलांचा उमेदवारी अर्ज दाखल!
