भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे 19 वे अधिवेशन होणार 2 व 3 ऑगस्टला …..

भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे एकोणीसावे अधिवेशन पंढरपुर येथे होणार असुन सदर अधिवेशनास माजी केंद्रीय मंत्री.शरदचंद्र पवार हे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थीत राहणार आहेत. अधिवेशनाचे उद्घाटन थोर विचारवंत व मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी आफ इंडिया पक्षाचे सरचिटणीस कॉम्रेड दीपाशंकर भट्टाचार्य यांच्या शुभहस्ते होणार आहे. शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणिस व पुरोगामी विचारांचे खंदे समर्थक भाई जयंत पाटील या़चे मार्गदर्शन महत्वाचे ठरणार आहे.

तसेच अधिवेशनाच्या अध्यक्ष स्थानी कोल्हापुर जिल्ह्याचे थोर विचारवंत भाई संपतराव पवार -पाटील असणार आहेत.तसेच या अधिवेशनास मा.कराळे मास्तर यांच्यासहित अनेक विचारवंत अधिवेशनामध्ये मार्गदर्शन करणार आहेत.
तरी या महत्त्वपुर्ण अधिवेशनास सर्वांनी उपस्थीत राहावे, असे अवाहन अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष डॉ.भाई बाबासाहेब देशमुख यांनी केले आहे.