शहाजी बापूंचा जानकरांना चिमटा……..

राज्यात माढा लोकसभा मतदारसंघावरून जोरदार चर्चा होत आहे. माढा लोकसभा मतदारसंघातील अजित पवार गटाचे नेते उत्तम जानकर यांच्या नाराजीनंतर चर्चांना उधाण आलं आहे. नाराज उत्तम जानकर यांनी काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती.त्यानंतरही उत्तम जानकर यांची नाराजी दूर झाली नाही. उत्तम जानकर यांच्या नाराजीनाट्यावरून शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी चिमटा काढला आहे.

शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील म्हणाले, ‘उत्तम जानकर हे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी विशेष विमानाने नागपूर येथे गेले होते. यावेळी आपणही सोबत होतो. जानकरांचं भाजपशी लग्न जुळत आले होते. पण नवरदेवाने हुंडा जास्त मागितला. हुंडा ऐकून आम्ही बेशुद्ध पडायचे राहिले होतो, असे म्हणत उत्तम जानकर आणि फडणवीस यांच्या भेटीचा गौप्यस्फोट आमदार शहाजी बापू पाटील यांनी केला.