खानापुरात आज……

बेनापूर (ता. खानापूर) येथे मंगळवार म्हणजेच आज ३० एप्रिल रोजी श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त कुस्ती मैदानाचे आयोजन केले आहे. या कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकासाठी आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलातील पुण्याचा उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड व हनुमान आखाडा पुणेचा माउली कोकाटे यांच्यात तीन लाखांच्या प्रथम इनामासाठी लढत होणार आहे.

द्वितीय क्रमांकाच्या दोन लाखांच्या इनामासाठी बहादूर गड आखाडा हरयाणाचा मंजित खत्री व सेनादलाचा महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील यांच्यात लढत होणार आहे. एक लाख पंचाहत्तर हजारच्या इनामासाठी आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुणेचा पै. वेताळ शेळके व हरयाणाचा पै. बिनाकुमार यांच्यात लढत होणार आहे. एक लाख रुपयांच्या इनामासाठी भोसले व्यायाम शाळा सांगलीचा पै. संदीप मोटे व शिवराय दादा तालीम पुणेचा सुनील फडतरे यांच्यात लढत होणार आहे.