सोलापूरात तापमानाचा पारा वाढताच १४ जणांना उष्माघात!

सोलापुरमध्ये उन्हाच्या कडाक्याने नागरिक त्रासले आहेत. या सोबत अचानक चक्कर येणे, नाकातून रक्त येणे असे प्रकार होऊ लागले आहे. जिल्हाभरात एकूण १४ जणांना उष्माघात झाल्याची नोंद झाली आहे.जिल्ह्यात उन्हाचा कडाका खूप अधिक वाढला आहे. काही दिवसात तापमानाने मोठा जोर लावला आहे.

यावर्षी उन्हाळ्यात ४३.७ अंश सेल्सिअस एवढ्या विक्रमी तापमानाची नोंद झाली आहे. कडक उन्हामुळे रस्त्यावरील वाहतूक कमी झाली आहे. या शिवाय उन्हाचा त्रास असह्य झाल्याने ताप येण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. दुपारी १२ ते ५ कालावधीत शक्यतो घराबाहेर उन्हात जाण्याचे टाळावे, फारच आवश्‍यक असल्यास योग्य त्या उपाययोजना करून बाहेर जावे, असा सल्ला आरोग्य खात्याने दिला आहे.