सोलापुरात प्रणिती शिंदे, सुशीलकुमार शिंदेंचा ठाकरेंना झटका! शेवटच्या क्षणी अपक्षाला पाठिंबा…

 सोलापूर दक्षिण मतदारसंघात  खासदार प्रणिती शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला झटका दिला असून अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना थेट पाठिंबा देत त्यांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी या मतदारसंघातील जनतेला केले आहे. त्यामुळे ऐनवेळी प्रणिती शिंदे आणि सुशीलकुमार शिंदे यांच्या भूमिकेनं ठाकरेंना धक्का बसला आहे. प्रणिती शिंदे यांनी ही मैत्रीपूर्ण लढत असल्याचे काडादी यांना काँग्रेसचा एबी फॉर्म न देत महाआघाडीचा धर्म पाळला असल्याचा दावा केला आहे. 

सोलापूर दक्षिण विधानसभामतदारसंघातून ठाकरे गटाकडून उमेदवार देण्यात आला आहे. मात्र खासदार प्रणिती शिंदे आणि माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आघाडीच्या अधिकृत उमेदवाराचा प्रचार न करता अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांच्यासाठी प्रचारात आघाडी घेतली होती. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने जागा वाटपात या मतदारसंघावर केलेला दावा चुकीचा असल्याचे सांगत आम्ही सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांच्या बाजूने मतदानाचे आवाहन केले असल्याचे सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटलं आहे.