स्वाभिमानी’चे शिरोलीत खर्डा – भाकरी आंदोलन

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने चालू हंगामात उसाला ३,५०० रुपये प्रतिटन दर जाहीर करावा, मागील फरक चारशे रुपयेने द्यावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शिरोलीत माजी आ. महादेवराव महाडिक यांच्या निवासस्थानी त्यांना खर्डा – भाकरीची शिदोरी देऊन आंदोलन करण्यात आले.

यावेळी महाडिक यांनी ऊस दराची कोंडी फोडावी, अशी मागणी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली. परंतु, माजी आ. महाडिक यांनी तो अधिकार आपणास नाही, असे सांगितले. यावेळी शेतकरी संघटनेचे राहुल पाटील, विक्रम पाटील, दिनकर पाटील, राजू रेपे, नीलेश भोसले, अशानंद मिठारी, राजाराम कारखान्याचे माजी अध्यक्ष दिलीप पाटील, शिरोलीचे सरपंच प्रतिनिधी कृष्णात करपे, माजी सरपंच अनिल शिरोळे आदी उपस्थित होते.