इचलकरंजीतील विद्यार्थ्यांचा अनोखा प्रकल्प!

इचलकरंजी येथील ‘डीकेटीई’च्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागातील विद्यार्थ्यांनी दुभत्या जनावरांच्या आरोग्याची माहिती देण्यासाठी ‘स्मार्ट टॅग’ बनवला आहे. या अत्याधुनिक प्रकल्पाच्या डिझाईनमध्ये इंटरनेट ऑफ थिंग अँड क्लाउड बेसड् डाटा लॉगिंगचा वापर केला आहे.

त्यामुळे जनावरांच्या शरीराचे तापमान, ऑक्सिजनचे प्रमाण, हार्ट रेट व जनावरांची हालचाल बघण्यासाठी ही कार्यप्रणाली विकसित केलेली आहे. मैनुदीन मुल्ला, ओम पवार व सिद्दिक इचलकरंजे या विद्यार्थ्यांनी प्रा. व्ही. बी. सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांसाठी ‘कॅटल हेल्थ मॉनिटरिंग स्मार्ट टॅग’ हा अनोखा प्रकल्प विकसित केलेला आहे.

या प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे सोलार आणि बॅटरीवर काम करणारी ही प्रणाली आहे. स्मार्ट टॅगची बॅटरी ही सौर ऊर्जेवर चार्ज होऊ शकते. या नावीन्यपूर्ण प्रकल्पाबद्दल ‘डीकेटीई’चे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, आमदार प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ. सपना आवाडे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.