इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने मार्च महिना संपत आल्याने घरफाळा व पाणीपट्टी वसुलीची मोहिम अधिक तीव्र केली आहे. घरफाळ्याचे मागील थकबाकी व चालू मागणी अशी एकूण ७१ कोटी रुपये तर पाणीपट्टीची थकबाकी व चालू मागणी अशी २८ कोटी रुपये आहे. यापैकी घरफाळ्याचे ४२.२० कोटी रुपये तर पाणीपट्टीचे ५.७२ कोटी रुपये वसुल झाले आहेत.अजून घरफाळ्याचे २८.८० कोटी रुपये तर पाणीपट्टीचे २२.२८ कोटी रुपये थकले आहे. दरवर्षी महानगरपालिकेच्या वतीने शहरातील मिळकतधारकांकडून पाणीपट्टी व घरफाळा कर वसुल केला जातो.
त्या अनुषंगाने नोटीसा पाठविल्या जातात. मिळकतधारकांना कर भरण्यासाठी सवलतीही लागू केली जाते. तर मार्च महिना जवळ येताच महानगरपालिकेच्या कर व विभागामार्फत प्रत्येक भागात कर भरण्यासाठी नागरिकांना आवाहन केले जाते. त्यासाठी पथकांची निर्मिती केली आहे. त्याद्वारे कर वसुली मोहिम ला राबविली जात आहे. वारंवार नोटीसा बजावूनही कर न भरणाऱ्यांवर घरफाळा वसूलीपोटी कारवाई करताना महापालिकेचे अधिकारी. कारवाईचा बडगा उगारला जात आहे. त्याच अनुषंगाने आजवर १६८ मिळकती सील करण्यात आली असून १८४ जणांचे पाणी कनेक्शन तोडण्यात आले आहेत.
मार्च महिना संपण्यास अवघे काही दिवस उरल्याने महानगरपालिकेच्या कर वसुली विभागाने मोहिम तीव्र केली असून मिळकतधारकांनी लवकरात लवकर कर भरण्याचे आवाहन केले जात आहे. कर न भरणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असून कटुप्रसंग टाळावेत असे सांगितले आहे.