युवानेते सुहासभैया बाबर यांनी जपली संस्काराची गोडी!

सालाबादप्रमाणे शिराळे खुर्द ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे कार्वे येथे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. हरिभक्त पारायण कै. दत्तात्रय महादेव जाधव यांच्या स्मरणार्थ कार्वे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष आणि खानापूर तालुका खरेदी विक्री संघाचे विद्यमान संचालक बाजीराव नाना जाधव यांच्याकडे पंढरपूर पायी दिंडीचे पंधरावे वर्ष सोमवार दिनांक आठ जुलै रोजी साजरे करण्यात आले.

प्रतिवर्षी दिंडीच्या स्वागतासाठी आवर्जून उपस्थित असणाऱ्या कैलासवासी आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या अकाली निधनामुळे त्यांची निर्माण झालेली अनुपस्थिती भरून काढण्यासाठी त्यांचे सुपुत्र युवा नेते सुहास भैया बाबर आणि त्यांच्या पत्नी सोनिया ताई बाबर यांनी भरून काढली.

सुहास भैया बाबर यांनी आपल्या पत्नीसह दिंडीचे स्वागत आणि पूजन केले. सोहळ्याच्या महाप्रसादाचा दिंडी सोहळ्यातील वारकऱ्यांसोबत नागरिकांनी लाभ घेतला. या पायी दिंडीच्या निमित्ताने कार्वे गाव आणि परिसर भक्तीमय वातावरणात रंगून गेला होता.