अंबप ग्रामपंचायत माझी लाडकी बहीण योजनेत आघाडीवर राहणार ……

अंबप येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे ऑनलाइन फॉर्म भरण्याचा प्रारंभ व मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी सरपंच दीप्ती माने, तर माजी जिल्हा परिषद सदस्या मनीषा माने प्रमुख उपस्थित होत्या. यावेळी महिला मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित होत्या.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबविण्यासाठी अंबप ग्रामपंचायतीने गावपातळीवर प्रबोधन केले आहे. सूक्ष्म नियोजन करून महिलांना चांगली सुविधा उपलब्ध करून दिली आहे. योजना राबविण्यात ग्रामपंचायत आघडीवर राहील. योजना गतिमान करण्यासाठी प्रशासन सर्वोतोपरी सहकार्य करेल, असे प्रतिपादन तहसीलदार कल्पना ढवळे यांनी केले.