खानापूरच्या मैदानात माउली कोकाटेची बाजी मोहरमनिमित्त कुस्त्या….

खानापूर येथील हिंदू- मुस्लीम ऐक्याचे प्रतीक असलेल्या मोहरमनिमित्त गुरुवारी आयोजित कुस्ती मैदानात उपमहाराष्ट्र केसरी माउली कोकाटे विजेता ठरला. अडीच लाखांचे इनाम असलेल्या या कुस्तीत माउलीने महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील याला ३१ व्या मिनिटात एकलांगी डावावर चीतपट केले आणि कुस्तीशौकिनांची वाहवा मिळवली. खानापूर येथे मोहरमनिमित्त कुस्ती मैदानाची सुमारे दीडशे वर्षांची परंपरा आहे. माँसाहेब दर्गा मैदान परिसरात भरवण्यात आलेल्या मैदानात साडेतीनशेवर कुस्त्या झाल्या. मैदानात नालसाहेब सवारी वैभव राजमाने यांच्या हस्ते माउली कोकाटे व पृथ्वीराज पाटील यांची कुस्ती लावण्यात आली. नामदेव चव्हाण व पृथ्वीराज चव्हाण यांनी ही लढत पुरस्कृत केली होती. सुरुवातीपासूनच एकमेकांच्या ताकदीचा अंदाज घेत दोन्ही मल्लांनी आक्रमक खेळी केली. ३१ व्या मिनिटाला एकलांगी डाव टाकत माउलीने पृथ्वीराजला अस्मान दाखवले.
जगदीश टिंगरे यांनी पुरस्कृत केलेली द्वितीय क्रमांकाची दोन लाख

खानापूर येथे गुरुवारी आयोजित कुस्ती मैदानात उपमहाराष्ट्र केसरी माउले कोकाटे याने बाजी मारली. रुपये इनामाची संदीप मोटे व सुदर्शन कोतकर यांच्यातील लढत ४० मिनिटांनंतर बरोबरीत सोडवण्यात आली. मोहरम कुस्ती कमिटीने पुरस्कृत केलेल्या तृतीय क्रमांकाच्या दीड लाख इनामाच्या कुस्तीत सुबोध पाटील याने संतोष जगतापवर प्रेक्षणीय विजय मिळवला. अभिजित देवकर (बेनापूर) याने उमेश चव्हाण याला पराभूत करून ७५ हजार रुपयाचे इनाम पटकावले. मैदानात नाथा पवार, सतपाल शिंदे, शंतनू शिंदे यांनी प्रेक्षणीय खेळ केला.