नुकतीच विशाळगडमध्ये काही समाजकंटकांनी तेथे राहणाऱ्या लोकांच्या घरावर हल्ला करून प्रापंचिक साहित्यांचे मोठे नुकसान केल्याची घटना घडली. या घटनेचा निषेध व्यक्त करत हेरले येथे गाव बंदचा निर्णय घेण्यात आला. यावेळी हेरले गावातील व्यापारी असोसिएशन तसेच हॉटेल असोसिएशन, आठवडी बाजार असोसिएशन व सर्व ग्रामस्थांनी गाव बंदला उस्फूर्त प्रतिसाद देऊन पाठिंबा दर्शविला.
यावेळी शांतता रॅली देखील काढण्यात येणार होती. ही रॅली यादगार चौक ते हेरले ग्रामपंचायत पर्यंत जाणार होती. पण सर्व हेरले गावातील बांधव यादगार चौकामध्ये नऊ वाजता आले असता पोलीस प्रशासनाने जमावबंदीचा आदेश असल्याचे सांगत रॅली काढू नये असे आवाहन केले. यावेळी पोलीस प्रशासनाला सहकार्य करून रॅली रद्द करण्यात आली.
