खानापुरात 300 हून अधिक कुस्त्या…

खानापुरात मोहरम निमित्त माँसाहेब दर्ग्यात आयोजित करण्यात आलेल्या कुस्ती मैदानात उपमहाराष्ट्र केसरी परिमाऊली कोकाटे यांनी महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील यास एकलांगी डावावर अस्मान दाखवले. या मैदानात लहान मोठ्या सुमारे 300 हून अधिक चटकदार कुस्त्या झाल्या. मैदानात शंभर रुपये पासून 25000 पर्यंत शेकडो चटकदार कुस्त्या झाल्या.