सध्या अनेक भागातील यात्रा सुरु आहेत. अनेक कार्यक्रमांचे आयोजन या यात्रेनिमित्त करण्यात येते. यामध्ये मग अनेक स्पर्धा, बैलगाडी शर्यत, घोडागाडी शर्यती घेतल्या जातात. परगावहून अनेक शहरवासीय यात्रांमुळे गावाकडे येत असतात. वाळवा तालुक्यातील भवानीनगर गावची ग्राम यात्रा बुधवारी ५ फेब्रुवारीला होणार असून, त्याच दिवशी संध्याकाळी लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम होणार असल्याची माहिती भरत कदम आणि बबन शिंगाडे यांनी दिली. रथसप्तमीच्या दुसऱ्या दिवशी दि.५ रोजी संध्याकाळी रघुवीर महाडिक यांचा लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम होणार असून, खास महिलांसाठी ६ रोजी मृणाल कुलकर्णी आणि त्यांच्या समवेत लावण्यखणी हा लावण्यांचा कार्यक्रम होणार आहे.
बुधवारपासून वाळवा तालुक्यातील भवानीनगर यात्रेस प्रारंभ, विविध कार्यक्रमांचे आयोजन
