केंद्र सरकारच्या मदतीतून इचलकरंजीत २० पी. एम. ई – बस मंजूर झाल्या आहेत. जानेवारीत महापालिकेकडून या बस दाखल होण्याची शक्यता आहे. त्यासाठी सोलगे मळ्यामध्ये बस आगाराची निर्मिती केली जात आहे. बस मंजूर होऊन सहा महिन्याचा कालावधी लोटला तरी अद्याप त्यात फारसी प्रगती झालेली दिसत नाही. वीज वितरण कंपनी, महापालिका आणि संबंधित कंपनी या तीन घटकांकडून आगर निर्मिती आणि तेथील भौतिक सुविधांची उभारणी व बांधणी केली जात आहे.
वास्तविक नागरिकांच्या संबंधित काम असल्याने या कामाला गती देण्याची गरज आहे. एकूणच प्रत्यक्ष जागेवरील कामाची गती बघितली तर अद्याप सहा महिने काम पूर्ण होण्याची शक्यता दिसत नाही. जर असेच काम रेंगाळत राहिले तर नागरिकांना सुविधा कशा मिळणार हाही प्रश्न आहे. बसचे जे काम बघत होते. त्या उपायुक्त सोमनाथ आढाव यांची बदली झाली आहे. त्यानंतर या कामाचा पदभार उपायुक्त प्रसाद काटकर यांना देण्यात आला आहे. प्रसाद काटकर यांचा प्रत्येक कामात धडाका असतो. ते काम गतीने करण्यासाठी प्रयत्न करतील तरीही या कामात आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी लक्ष घातले पाहिजे.
आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांना शहराची जाण आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांना इचलकरंजी आणि परिसराची चांगली जाण आहे. कामगार वस्ती आणि येथे लागणाऱ्या सुविधांची त्यांना जाण आहे. त्यांनी स्वतः या कामात लक्ष घातल्यास या
कामाला चांगली गती मिळेल आणि त्यांच्या हातून एक त्यांच्या कार्यकाळात एक उत्तम काम होईल असे शहरवासियांतून बोलले जात आहे.
