वडीलांच्या प्रखर इच्छाशक्तीच्या जोरावर व स्वतःच्या मेहनतीवर इचलकरंजी येथील श्री. राजू बोरगावे यांनी वाहन विक्री व्यवसायात आपले एक वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे. सामान्य कुटुंबातील सर्व घटनेचे साक्षीदार होत व्यवसायात पदार्पण करताना वडीलांना वाटणारी भीती दूर करुन त्यांचे स्वप्न साकारण्याचे कार्य येथील बोरगावे ॲटोमोबाईल्सच्या माध्यमातून श्री. राजू बोरगावे यांनी केले आहे. मुलगा आणि वडीलांची जोडी काहीकाळ एकत्र काम केल्यानंतर मिळालेल्या प्रेरणेचे मोठ्या यशात कसे रुपांतर होते ते बोरगावे ॲटोमोबाईल्सच्या यशस्वीतेवरुन दिसून येते.
वडिलांच्या पश्चात राजू बोरगावे यांनी त्यांचे केलेले स्वप्न पूर्ण हेही त्यांना अभिमानास्पद आहे.कंपनीतर्फे नव्याने गेल्या तीन वर्षांपासून इलेक्ट्रीक स्कुटरच्या उत्पादनाला सुरूवात झाली आहे. त्यामध्ये i qube हे मॉडेल ग्राहकांच्या पसंतीस उतरले आहे.इचलकरंजीत सर्वात जास्त इलेक्ट्रीक स्कुटरची विक्री बोरगावे अॅटोमाबाईल्सतर्फे होते.
राजू बोरगावे म्हणाले, “माझ्या उद्योगाची सुरूवात १९९२ साली झाली. ९० साली मी डिप्लोमाचे प्रशिक्षण पूर्ण केले. पण शिक्षण पूर्ण करुन देखील त्या कामामध्ये कधी रसच राहिला नाही. लहानाचा मोठा झालो तोच मुळी घरच्या ॲटोमोबाईलचा व्यवसाय बघतच. त्यामुळे मन नेहमी त्यातच रमायचे व शेवटी आवड हीच या उद्योगाची सुरूवात ठरली. वडिलांनी माझी आवड पाहता व माझ्या इच्छेखातर मला १९९२ मध्ये एक छोटेअसे सर्व्हस सेंटर राजर्षी शाहू पुतळ्याजवळ सुरू करुन दिले.
तेही मेन बिल्डींगच्या साईड मार्जिनमधील जागेवर प्रायोगिक तत्वावरच म्हणावे. पण येथूनच माझ्या ॲटोमोबाईल व्यवसायाची सुरूवात झाली. आजपर्यंतचा हा यशस्वी प्रवास, आई-वडिलांचे आशीर्वाद, घरच्या लोकांची साथ, बरोबर काम करणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचे कष्ट तसेच ग्राहकांना आमच्यावर असणारा विश्वास या सर्वांच्या जोरावर व्यवसायाची अखंड वाटचाल सुरू आहे.
