सांगोला येथे श्री गोकुळाष्टमी उत्सवानिमित्त विठ्ठल मंदिर कोष्टी गल्ली येथे अखंड हरिनाम सप्ताह, श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा मंगळवार दि. २० ऑगस्ट ते मंगळवार दि. २७ ऑगस्ट २०२४ या कालावधीत आयोजित करण्यात आला असल्याची माहिती संयोजक श्री विठ्ठल मंदिर कोष्टी गल्ली पुरुष व महिला भजनी मंडळ सदस्य यांनी दिली आहे. पाच ते सहा काकडा आरती, सकाळी ६ ते ७ श्री पांडुरंगाची महापूजा, सकाळी ७ ते ११ सामुदायिक ज्ञानेश्वरी पारायण व गाथा भजन, दुपारी १ ते २.३० महिला भजन, दुपारी ३ ते ५.३० भागवत कथा, सायंकाळी ५:३० ते ६:३० हरिपाठ आणि रात्री ७ ते ९ श्री हरी किर्तन आदी कार्यक्रम होणार आहेत.
दररोज दुपारी ३ ते ५.३० या वेळेत ह.भ.प. स्वरूपानंद महाराज देशपांडे, वृंदावन सांगोला यांचा भागवत कथा कार्यक्रम होणार आहे. व्यासपीठ चालक म्हणून ह.भ.प. दत्तात्रय पांचाळ सर महाराज- सांगोला, ह.भ.प. मधुकर महाराज सानप – परभणी आणि ह.भ.प मोहन महाराज- परभणी हे जबाबदारी सांभाळणार आहेत. विणेकरी म्हणून ह.भ.प. आळंदीकर महाराज, गायनाचार्य म्हणून ह.भ.प.मधुकर महाराज सानप (परभणी) तर मृदुंगाचार्य म्हणून ह.भ.प.मोहन महाराज जाधव व ह.भ.प. संतोष महाराज दौंड हे जबाबदारी स्वीकारणार आहेत.
गुरुवार दि. २२ ऑगस्ट रोजी सकाळी ६:३० ते ७:३० या वेळेत ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचा नामसाधना सामुदायिक जप कार्यक्रम होणार आहे. किर्तन साथ, गायक, मृदुंगमणी, टाळकरी, विणेकरी यांची जबाबदारी ह.भ.प आळंदीकर महाराज यांचेकडे देण्यात आली आहे. कलश पूजन श्री. अवधूत चंद्रकांत कुमठेकर यांच्या शुभहस्ते, विणापूजन श्री. अच्युत फुले व श्री. वसंत गावडे यांच्या शुभहस्ते आणि ग्रंथ पूजन श्री. भास्कर सपाटे व श्री. रेवणभाऊ मदने यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे.
मंगळवार दि. २७ ऑगस्ट रोजी सकाळी ८ ते ९ या वेळेस श्री ज्ञानेश्वरी ग्रंथ दिंडी तर सकाळी १० ते १२ या वेळेत ह. भ. प. श्री मधुकर महाराज सानप यांचे काल्याचे किर्तन होणार आहे. त्यानंतर दुपारी १२ ते ३ या वेळेत महाप्रसाद कार्यक्रम आयोजित केला आहे.