येडेनिपाणी (ता. वाळवा) येथील मल्लिकार्जुन यात्रा २ सप्टेंबर रोजी श्रावणातील शेवटच्या सोमवारी साजरी होत आहे. या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी मल्लिकार्जुन दर्शनासाठी गर्दी होते. त्या दृष्टीने मल्लिकार्जुन सेवाभावी मंडळ व देवस्थान समितीने यात्रेची पूर्वतयारी केली आहे. येडेनिपाणी गावाच्या दक्षिणेकडील डोंगर रांगेत श्रीक्षेत्र मल्लिकार्जुन मंदिर आहे. श्रावणातील प्रत्येक सोमवारी येथे भाविकांची मोठी गर्दी होत असते. पहाटेपासूनच अभिषेक घालण्यासाठी व दर्शनासाठी प्रत्येक सोमवारी मोठी रांग लागलेली असते. त्यातूनच दर्शन घ्यावे लागते. या श्रावण महिन्यात पाच सोमवार आलेत. आज शेवटच्या सोमवारी येथे मोठ्या प्रमाणात यात्रा भरते. हजारो भाविक दर्शनास येतात.