सप्टेंबरच्या ‘या’ तारखेला होईल महागाई भत्ता वाढीची घोषणा? मिळेल 3 महिन्याची थकबाकी

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत एक महत्त्वाची बातमी समोर येत असून कर्मचारी ज्या महागाई भत्ता वाढीची आतुरतेने वाट पाहत आहेत त्यांना या महिन्यात लवकरच याबाबतीत काहीतरी आनंदाची बातमी ऐकायला येणार असल्याची माहिती समोर आलेली आहे.

कारण लवकरच आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या महागाई भत्त्यामध्ये तीन टक्क्यांची वाढ केली जाण्याची शक्यता असून त्यामुळे कर्मचाऱ्यांना खूप मोठा दिलासा मिळणार आहे.

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या महागाई भत्त्या हा जुलै 2024 पासून लागू होणार असून त्याची तारीख आता निश्चित झाल्याचे जवळपास जमा आहे. साधारणपणे सप्टेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत महागाई भत्ता वाढीची घोषणा होणार असून या महागाई भत्त्यामध्ये किती वाढ होईल हे एआयसीपीआय निर्देशांकाच्या जानेवारी ते जून 2024 च्या आकडेवारी वरून जवळपास स्पष्ट झालेले आहे.सातव्या वेतन आयोग अंतर्गत असलेली केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना 53% महागाई भत्ता दिला जाणार असून 25 सप्टेंबर रोजी होऊ घातलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये यासंबंधीची घोषणा होण्याची दाट शक्यता आहे.