आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला प्रत्येक पक्षातून जोरदार मोर्चेबांधणी सुरु झालेली आहे. गावोगावी तसेच अनेक मतदारसंघांमध्ये सभा, मेळावे यांचे आयोजन देखील करण्यात येत आहे. अशातच खानापूर आटपाडी मतदारसंघात महायुतीतून शिवसेना शिंदे गटाकडून सुहास भैय्या यांची उमेदवारी निश्चित आहे. अशातच सुहास भैय्यांसाठी थेट मुख्यमंत्र्यांचा कक्ष हा गावकऱ्यांच्या दारी पोहोचला आहे.
मुख्यमंत्री सहायता निधी कक्षातून खानापूर मतदारसंघाला आजवर कोट्यवधींचा निधी उपलब्ध झालेला आहे. या निधीच्या माध्यमातून मतदारसंघातील शेकडो लोकांना उपचारासाठी मोठे अर्थसहाय्य देखील प्राप्त झालेले आहे.
ना वशीला ना ओळख थेट मिळते मदत या तत्त्वावर राज्यभर आरोग्य वारी सुरू झाली आहे. त्या आरोग्यवारीच्या माध्यमातून नागरिकांना माहिती देण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या प्रतिनिधींनी विटा शहराला भेट दिली आहे. यावेळी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष प्रमुख रामहरी राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली.
या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री सहायता निधीतून दिल्या जाणाऱ्या अर्थसहाय्याबाबत माहिती देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी नागरिकांनी 8650567567 या क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता रामहरी राऊत यांनी केले आहे.