हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव येथे श्री भरत अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या आठव्या शाखेचा शुभारंभ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांच्या हस्ते तसेच कोल्हापूर जिल्हा नागरी बँक असोसिएशनचे अध्यक्ष निपुण कोरे अध्यक्षतेखाली साजरा झाला. भरत बँकेच्या व्यवस्थापनाने अडचणीमधून मार्ग काढत बँकेला सक्षमपणे यशाच्या शिखरावर ठेवून आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमठवला आहे.
सहकारामध्ये आर्थिक शिस्त महत्त्वाची आहे असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी यावेळी व्यक्त केले. या बँकेस कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट नागरी बँक पुरस्कार, उत्कृष्ट परफॉर्मन्स करीता बँको ब्ल्यू रिबन पुरस्काराने सन्मानित केलेल आहे.