ऐन सण – उत्सवांमध्ये खाद्यतेलासह खोबरं, चनाडाळीचे दर गगनाला भिडले

ऐन सणासुदीच्या काळात स्वयंपाक घरातील किराणा मालाच्या वस्तुंनी महागाईचा कळस गाठला आहे. दरात गेल्या महिन्याच्या तुलनेत १० ते १५ टक्यांनी वाढ झाली असून, तेल, साखर, शेंगदाणे, चणादाळ यांच्या दरवाढीने गृहीणींचे बजेट कोलमडले असून, ऐन सणासुदीच्या काळात वाढत्या महागाईने चिंता वाढली आहे.गणेशोत्सव संपून नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. या काळात उपवासाचे पदार्थ, विविध प्रकारचे मिष्टान्न बनविण्यासाठी किराणा मालाच्या वस्तुंना मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली आहे.

साखर, तेल, रवा, बेसन, खारीक, खोबरे, साबुदाणा, शेंगदाणे अशा विविध प्रकारच्या जीवनाश्यक वस्तु खरेदीसाठी गृहिणींची बाजारात मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. मात्र याचवेळी खाद्यतेल, खोबरे, नारळ, चनादाळ, बेसन पोहे यांच्या किंमतीत सरासरी 10 टक्के दरवाढ झाली आहे. यामुळे सणासुदीच्या काळात महागाईच्या झटक्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे.