खानापूर मतदारसंघात उडाला धमाका! तुतारीकडून सदाशिवराव भाऊ पाटील

विधानसभा आचारसंहिता सुरू झाल्यानंतर प्रत्येक मतदार संघामध्ये नेते मंडळींची मोर्चे बांधणीला सुरुवात सुरू असलेली पाहायला मिळतच आहे. सर्वच राजकीय पक्षांची जागा व उमेदवार निश्चितीचीधावपळ सुरू आहे. अशातच खानापूर मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून आटपाडीचे माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख व विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील या दोघांची स्पर्धा सुरू असताना तुतारी शरदचंद्र पवार गटाकडून संभाव्य उमेदवार म्हणून माजी आमदार सदाशिवराव पाटील यांचे नाव संभाव्य यादीत आल्याने विटा शहरासह मतदारसंघांमध्ये धमाका उडाला आहे.

एकीकडे वैभव पाटील यांनी मी स्वतः उमेदवारी करणार असे म्हणून मतदारसंघांमध्ये प्रचाराला सुरुवात केलेली आहे असे असतानाच संभाव्य यादीमध्ये माजी आमदार सदाशिवरावभाऊ पाटील यांचे नाव आल्याने मतदारसंघांमध्ये चर्चेला उधाण आलेलं आहे. काल माजी आमदार व सदाशिवराव भाऊ पाटील यांनी मुंबई येथे राष्ट्रवादीचे पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली असल्याची चर्चा जोरदार सुरू आहे.