इचलकरंजीतील महावितरणचे कंत्राटी कर्मचारी ५ मार्चपासून बेमुदत संपावर…..

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या विभाजित निर्मिती, पारेषण, वितरण या वीज कंपन्यांमध्ये ४२ हजारांच्या वर कंत्राटी, आऊट सोर्सिंग कामगार १५ ते २० वर्षांपासून अल्प पगारावर काम करत आहे. वीज कंपन्यांतील कंत्राटी कामगारांच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनास इचलकरंजीतील महावितरणचे कंत्राटी कर्मचाऱ्यांनी पाठिंबा दिला आहे. दोन दिवसांचा संप इचलकरंजीतील कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे. सर्व मागण्या मान्य न झाल्यास ५ मार्चपासून ते बेमुदत संपावर जाणार आहेत. संपात शहरातील तीन विभागांतील ११७ कर्मचारी सहभागी झाले आहेत.

संपाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या चर्चेत कंत्राटी कामगारांच्या प्रश्नावर सरकारला सकारात्मक निर्णय घ्यायचा आहे, असे आश्वासन दिले होते. कामगार संघटनांकडून कंत्राटी कामगारांना सामावून घेण्यासाठी प्रस्ताव मागितले होते. सरकार व प्रशासनाने तातडीने लक्ष घालून चर्चा आयोजित करून सकारात्मक तोडगा काढावा, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली.