मा. जयंत पाटील यांनी मोठी आघाडी घेत १३,५०० मतांनी मिळवला विजय…

इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याविरोधात अजित पवार यांनी मोठी मोर्चेबांधणी करत निशिकांत पाटील यांना उमेदवारी दिली. मतमोजणीमध्ये सुरुवातीपासूनच दोन्ही नेते हजार मतांनी आघाडी पिछाडीवर होते. सुरुवातील जयंत पाटील यांनी आघाडी घेतली होती, यानंतर निशिकांत पाटील यांनी आघाडी घेतली. या मतदारसंघात मोठी चुरस निर्माण झाली होती. अखेर शेवटच्याक्षणी जयंत पाटील यांनी मोठी आघाडी घेत १३,५०० मतांनी विजय मिळवला आहे.

इस्लामपूर विधानसभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठी मोर्चेबांधणी केली होती. भाजपातील निशिकांत पाटील यांना उमेदवारी देऊन दोन मोठ्या प्रचारसभा घेतल्या होत्या. तर दुसरीकडे जयंत पाटील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रचारसभांसाठी महाराष्ट्राचा दौरा सुरू केला होता. मतदारसंघात पाटील यांचा प्रचार त्यांच्या कार्यकर्त्यांनी केला होता, जयंत पाटील यांच्यावर ऊसाच्या मुद्द्यावरुन टीका केल्या होत्या. या मदरासंघात ऊस दराचा मुद्दा मोठ्या प्रमाणात गाजला होता.