हातकणंगले विधानसभा मतदारसंघातून जनसुराज्य पक्षाचे उमेदवार दलित मित्र डॉ. अशोकराव कोंडीबा माने हे ४६ हजार २४९ मताधिक्याने विजयी झाले. अत्यंत अटीतटीची वाटणारी ही निवडणूक निकालानंतर एक हाती आल्याचे चित्र सर्वांनाच पाहायला मिळाले. वडील माजी मंत्री, माजी खासदार व पाच वेळा आमदार तसेच स्वतः एक वेळ आमदार असताना देखील यावेळी राजू बाबा आवळे यांना पराभव पत्करावा लागला.
तर दोन वेळा आमदार व गोकुळचे संचालक असतानाही डॉ. मिणचेकर यांचे डिपॉझिट जप्त झाले. आम्ही सत्ता नसताना अनेक विकास कामे केली आहेत महायुतीने अनेक योजना राबवलेल्या आहेत. मागील दोन्ही माजी आमदार विकास कामात कमी पडल्याने जनतेने नाकारले आहे. माझ्या आमदारकीचा मी मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी वापर करणार असल्याचे नूतन आमदार अशोकराव माने यांनी सांगितले.