‘राजारामबापू’ कारखान्यांची पहिली उचल ३२०० जाहीर

राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या साखराळे, वाटेगाव व कारंदवाडी युनिटकडील २०२४-२५ मध्ये गळितास येणाऱ्या उसास पहिली उचल ३२०० रुपये प्रतिटन देणार असल्याची घोषणा कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांनी केली.२०२४-२५ मधील अंतिम दर अंदाजे ३२७५ रुपये अपेक्षित असून उर्वरित रक्कम दीपावलीस देणार असल्याची माहिती तसेच जत-तिप्पेहळ्ळी युनिटकडील ऊसदराचा निर्णय लवकरच घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.


कारखाना व्यवस्थापनाने २०२४-२५ हंगामात साखराळे युनिटकडे ९ लाख ५० हजार टन, वाटेगाव – सुरुल युनिटकडे ५ लाख टन, कारंदवाडी युनिटकडे ४ लाख ५० हजार टन तसेच जत-तिप्पेहळ्ळी युनिटकडे ३ लाख असे एकूण २२ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. सर्व ऊस उत्पादक व सभासदांनी पिकविलेला सर्व ऊस गळितास पाठवून सहकार्य करावे, असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांनी केले आहे.