कोल्हापूर जिल्हा व शहर कुस्तीगीर असोसिएशनची निवड चाचणी स्पर्धा रविवारी २२तारखेला हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली येथील विजयी मैदान येथे होणार आहे.या स्पर्धेत वरिष्ठ ग्रीको रोमन राज्य अजिंक्यपद ५५ ते ९७ पर्यंतच्या वजन गटात निवड चाचणी होणार आहे. वरिष्ठ महिला अजिंक्यपद निवड चाचणी कुस्ती स्पर्धा ५० ते ७२ किलो वजन गटात तसेच महिला महाराष्ट्र केसरी खुला गट ६५ ते ७६ वजन गटात होणार आहे. याबाबतची माहिती विजयी कुस्ती संकुल समितीचे अध्यक्ष परशराम डावरे, कार्याध्यक्ष धुळा रामाण्णा, कुस्ती प्रशिक्षक राम कुशाप्पा यांनी दिली.
पट्टणकोडोलीत उद्या कुस्तीगीर असोसिएशनची कुस्ती निवड चाचणी
