आमदार जयंत पाटीलही या नागपुरातील हिवाळी अधिवेशनात सहभागी झालेले होते. त्यांच्या भूमिकेबद्दल आता सर्वत्रच वेगवेगळ्या चर्चा होत आहेत. विधानसभेतील अंतिम आठवडा प्रस्तावाच्या चर्चेत मा. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंतराव पाटील यांनी सहभाग घेतला. भारतीय जनता पक्षाच्या 2014 सालच्या जाहीरनाम्यात महाराष्ट्रात थांबणार नाही हे वाक्य होतं. परंतु महाराष्ट्रावर तेव्हा 3 लाख कोटी रुपयांचं कर्ज होतं आणि आता आपण नऊ लाख कोटी पर्यंत पोहोचलो आहोत असे म्हणत त्यांनी भाजपच्या गोष्टीची खिल्ली उडवली.
तसेच शासनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. एमआयडीसीची ताकद वाढवली जाईल असं आश्वासन भाजपने दिलेले होतं. पण राज्यातल्या कंपन्या बाहेर जात आहेत याकडे जयंत पाटील यांनी आवर्जून सरकारचे लक्ष वेधले. तसेच महाराष्ट्रात मोठा प्रकल्प यावा अशी जनतेची अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले. सोबतच भारतीय जनता पक्षाने मागील दहा वर्षांमध्ये दिलेल्या सर्व आश्वासनांची आठवण जयंतरावांनी सरकारला करून दिली.