इचलकरंजीतून विधानपरिषदेवर कोणाला मिळणार संधी? चर्चांना ऊत……

विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देत असताना आपल्याच पक्षात कार्यकर्त्यांवर झालेला अन्याय थोपवण्यासाठी राज्यातील वरिष्ठ नेत्यांनी विधान परिषद, महामंडळ आणि समित्यांच्या पदावर नियुक्ती करण्याचं आश्वासन दिलं होतं. त्याच्या पूर्ततेसाठी आता कार्यकर्ते आणि पदाधिकारी कामाला लागले आहेत. काहीजण विधान परिषदेसाठी तर काहीजण महामंडळ आणि विविध समित्यांवर नेमणूक होण्यासाठी फिल्डिंग लावत आहेत.

इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून भाजपचे माजी आमदार सुरेश हळवणकर यांना थांबवत नव्याने भाजपमध्ये प्रवेश केलेल्या राहुल आवाडे यांना संधी देण्यात आली. त्यामुळे आगामी होऊ घातलेल्या विधान परिषदेसातेठी भाजपमधून माजी आमदार सुरेश हाळवणकर यांचे नाव आघाडीवर आहे. तर भाजप नेते महेश जाधव हे देखील विधान परिषदेवर जाण्यासाठी आग्रही आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात विधान परिषदेवर कोणाला संधी दिली जाणार याबाबत चर्चांना ऊत आलेला आहे.