इचलकरंजीत आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीत होणार राजकीय उलथा पालथ……

दिवसेंदिवस राजकारणामध्ये अनेक चढ उतार हे होत असल्याचे चित्र सगळीकडेच पाहायला मिळत आहेतच. लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये राजकीय हालचालींना वेग आलेला होता. तसेच राजकीय समीकरणे देखील बदललेली पाहायला मिळाली. इचलकरंजीमध्ये देखील अशीच परिस्थिती झाली. लोकसभा निवडणुकीमध्ये खासदार धैर्यशील माने यांना मताधिक्य मिळाले आणि त्यांची खासदारपदी निवड झाली.

तसेच विधानसभा निवडणुकीत आवाडे यांनी भाजपमध्ये पक्ष प्रवेश करून विधानसभेचे तिकीट मिळवले. डॉ. राहुल आवाडे यांना प्रचंड मताधिक्य मिळाले व त्यांची आमदार पदी वर्णी लावली. म्हणजेच एकूणच दोन्हीही निवडणुकीमध्ये महायुतीचाच विजय झाल्यामुळे विरोधक थोडेसे चलबिचल झालेले आहेतच. आगामी महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे येणाऱ्या या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये कोणती भूमिका घ्यायची? असा प्रश्न विरोधकांसमोर उभा राहिलेला आहे. राजकीय अस्तित्वासाठी काहीतरी निर्णय घेतला पाहिजे ही भूमिका ठरवून नजीकच्या काळात इचलकरंजीत मोठ्या राजकीय उलथा पालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.