आज थर्टी फर्स्टसाठी सगळीकडे जोरदार तयारी झालेली आहे. जानेवारी रोजी साजरे होणारे नवीन वर्ष हा नवीन स्वप्नांचा आणि आशांचा सण आहे. हे नवीन सुरुवात आणि उत्सवाचे प्रतीक आहे. नवीन वर्षाच्या दिवशी, लोक अनेकदा स्वत: ला सुधारण्यासाठी आणि जीवन चांगले बनविण्याचे वचन देतात. ते नवीन आशा आणि भविष्यातील योजनांशी जोडलेले असते. हा दिवस मागील वर्षातील चुका मागे सोडून नवीन संधींकडे वाटचाल करण्याचे प्रतीक आहे. आशा आणि सकारात्मकतेने भरलेला हा दिवस आयुष्यात पुढे जाण्याची प्रेरणा देतो. परंपरेनुसार, विविध संस्कृतींमध्ये या दिवशी अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या दिवशी, लोक मिठाई वाटणे, फटाके फोडणे, मित्रांसोबत वेळ घालवणे आणि स्वादिष्ट पदार्थ खाणे यासारख्या विशेष गोष्टी करतात.

इतिहास आणि महत्त्व
हजारो वर्षांपासून विविध संस्कृतींमध्ये नवीन वर्ष साजरे केले जात आहे. 2000 ईसापूर्व मेसोपोटेमियामध्ये सर्वात जुने नवीन वर्ष साजरे केले गेले. त्यावेळी हा सण वसंत ऋतूत (मार्चच्या मध्यात) साजरा केला जात असे. नंतर, प्राचीन रोममध्ये, सम्राट ज्युलियस सीझरने 46 बीसी मध्ये कॅलेंडरमध्ये सुधारणा केली, 1 जानेवारी हा वर्षाचा पहिला दिवस घोषित केला. जानेवारीचे नाव रोमन देव ‘जॅनस’च्या नावावरून ठेवण्यात आले, ज्याला सुरुवात आणि शेवटचे प्रतीक मानले जाते.
नवीन वर्षाचा उत्सव आजही संपूर्ण जगाला एकत्र करतो. हा दिवस समाजाला पुढे जाण्यासाठी आणि चांगले भविष्य घडवण्याची प्रेरणा देतो. नवीन वर्षाची सुरुवात जीवनाच्या चक्रीय स्वरूपाचे प्रतीक आहे, आपल्याला प्रगती आणि सुसंवादासाठी प्रयत्नांची आठवण करून देते.

नवीन वर्षामध्ये काही करू शकता हे संकल्प
नकारात्मक लोकांपासून दूर राहणे
तुमच्या आजूबाजूच्या लोकांमुळे तुमच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. जर तुमचे मित्र, नातेवाईक किंवा तुमचे सहकारी तुम्हाला चांगली वागणूक देत नसतील तर त्यांच्यापासून दूर राहणे चांगले. अशा लोकांमुळे तुमचा तणाव वाढतो आणि तुमच्या आयुष्यात खूप नकारात्मकताही येते. त्यामुळे अशा लोकांपासून दूर राहण्याचा संकल्प यंदा घ्या.
साहित्य वाचन
सकारात्मक, प्रेरणादायक आणि मानसिक विकासाच्या दृष्टीने उपयुक्त असलेली पुस्तकं वाचा. वाचन तुमच्या मानसिक आरोग्यासाठी उत्तम आहे. त्यामुळे मोबाईलचा स्क्रीन टाइम मर्यादित ठेवून नवीन वर्षात किमान एक तास नियमित पुस्तक वाचण्याचा संकल्प करा.
स्वत: ची काळजी घेणे
अनेक वेळा आपण इतरांचा विचार करून स्वतःची काळजी घ्यायला विसरतो. त्यामुळे त्याचा फटका मानसिकतेवर पडतो. स्वतःची काळजी न घेतल्याने तुमचे मानसिक आरोग्य बिघडते. म्हणून स्वत:ची काळजी घेणे हा तुमच्या संकल्पाचा भाग बनवा.
सकाळी लवकर उठणे
नवीन वर्षात सकाळी लवकर उठण्याचा संकल्प करा. सकाळी लवकर उठल्यामुळे सकाळची शांतता तुमचे मन फ्रेश करण्यास मदत करते. तुम्हाला स्वतःची काळजी घेण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो.
शारीरिक व्यायाम
मानसिक आरोग्याच्या दृष्टीने शारीरिक व्यायाम अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यासाठी तुम्ही जीममध्ये जाऊन कठोर वर्कआऊट करा असा याचा अर्थ होत नाही. तर दररोज किमान 30 मिनिटे चाला, योग किंवा व्यायाम करा. हे तुमच्या मूडला उत्तेजित करेल आणि तणाव कमी करेल.
यापैकी एक संकल्प जरी तुम्ही यशस्वीरित्या पूर्ण केला तरी तुमचे मानसिक स्वास्थ्य चांगले राहण्यास, आणि नवीन वर्षात अपेक्षित यश मिळवण्यास तुम्हाला मदत मिळू शकते.