पेठवडगाव येथील शाहू क्रीडांगणासाठी ३ कोटीचा निधी मंजूर

सरकारकडून अनेक भागातील विकासासाठी निधी मंजूर केले जातात. यामुळे त्या भागातील प्रगतीत भर पडते. निधी हा अनेक योजनांद्वारे मंजूर केला जातो. नगरविकास वैशिष्टयपूर्ण योजनेतून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पेठ वडगावसाठी ५ कोटी मंजूर करून त्यामधील शाहू क्रीडांगणासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. वडगावातील शाहू क्रीडांगण मैदानाची पाहणी मुरलीधर जाधव यांनी केली. वडगावच्या प्रलंबित मागण्या मंजूर करण्यासाठी शिवसेना कटिबध्द असून त्याची पूर्तता करू तसेच वडगाव नगरपरिषदेसाठी भरीव निधी आणण्यासाठी प्रयत्न करूअसे आश्वासन गोकुळचे संचालक मुरलीधर जाधव यांनी दिले. 

माजी नगराध्यक्ष डॉ.मोहनलाल माळी यांनी वडगावच्या प्रलंबित मागण्यासाठी यापुढेही असेच सहकार्य करावे, असे सांगितले. वडगाव शिवसेना शहराध्यक्ष अक्षय मदने यांनी, जाधव यांनी आणलेल्या निधीमुळे वडगाव क्रीडांगणाचा दर्जा सुधारणार असून दर्जेदार क्रिडापट्टू तयार होतील. पंचक्राशीतील एक आदर्श क्रीडांगण म्हणून शाहू क्रीडांगणाकडे क्रिडाप्रेमी पाहतीअशी आशा व्यक्त केली. डॉ. सुरज कुठाळकर यांनी, क्रिडापटूंचा आनंदाचा क्षण असून त्यामुळे क्रिडास्पर्धेला प्रोत्साहन मिळेल, असे सांगितले.