आष्टा शहरातील अवैध धंदे बंद करावे अन्यथा मंगळवारी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा

सध्या प्रत्येक भागात अवैद्य धंदे खुलेआम सुरु आहेत. या अवैद्य धंद्यात तरुणाई जास्त प्रमाणात असल्याचे चित्र पहायला मिळत आहेत. त्यामुळे या अवैद्य धंद्यांना कुठेतरी लगाम घालणे खूपच गरजेचे आहे. या धंद्यात तरुणाई आपले भविष्य बरबाद करून घेत आहे. आष्टा शहरात देखील अवैद्य धंदे सुरु आहेत. हे अवैद्य धंदे बंद करण्याची मागणी सध्या जोर धरत आहे. आष्टा शहरातील अवैध धंदे बंद करावे अशा मागणीचे निवेदन दलित महासंघ प्राचार्य मच्छिंद्र सकटे गटाचे वाळवा तालुका युवक अध्यक्ष प्रवीण वारे यांच्या नेतृत्वाखाली आष्टा पोलीसांना देण्यात आले.

यावेळी दलित महासंघाचे वाळवा तालुका युवक अध्यक्ष प्रवीण वारे म्हणाले की आष्टा शहरात खुलेआम अवैध मटका जुगार व्हिडिओ गेम चालू आहे या अवैध मटका जुगारच्या नादी लागून आष्टा शहरातील असंख्य कुटुंब उध्वस्त झालेले आहेत काही लोकांनी मटका जुगार व व्हिडिओ गेमच्या नादी लागून आत्महत्या केलेल्या आहेत तरी आष्टा पोलिसांनी या जुगार मटका व व्हिडिओ चालकांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अन्यथा मंगळवारी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे यावेळी आष्टा शहर दलित महासंघाचे अध्यक्ष अनिल ( भाऊ ) थोरात, उपाध्यक्ष. लोकेश दिवटे, शैलेश वारे, प्रेम वारे, परवेज नायकवडी, कार्याध्यक्ष हसन सय्यद यास आष्टा शहरातील दलित महासंघाचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते