हातकणंगले येथे ‘संगांयो’चे अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा…

हातकणंगले तालुक्यातील संजय गांधी व श्रावणबाळ योजनेतील एकूण १७७४६ लाभार्थ्यांचे ऑक्टोबर व नोंव्हेंबर महिन्याचे ६ कोटी ३० लाख २८ हजार रुपयांचे अनुदान लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा झाले असून केंद्र शासनाकडील इंदिरा गांधी वृध्दापकाळ पेन्शन योजनेतील मार्च २०२४ पासुनच्या थकीत अनुदानापोटी ६९ लाख ५३ हजार रुपये लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत. तसेच फेब्रुवारी पासून डीबीटी द्वारे अनुदान जमा होणार असून ज्या लाभार्थ्यांचे आधार कार्ड मोबाईल नंबर अपडेट नाही. तसेच लाभार्थीची जन्म तारखेसह आधार कार्ड अपडेट नाही.

नवीन मंजुर लाभार्थ्यांचे बँक खाते नोंदवणे इत्यादी सुविधा तलाठी स्तरावर गावातच करणेच्या सुचना संजय गांधी समितीच्या आढावा बैठकीत देण्यात आल्या आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांनी वरील कामासाठी हातकणंगले तहसिलदार कार्यालय येथे न जाता गावातच तलाठी स्तरावर सोय केल्याची माहिती संजय गांधी समितीचे हातकणंगले तालुकाध्यक्ष झाकीर हुसेन भालदार, नायब तहसीलदार संदीप चव्हाण यांनी दिली. यावेळी समितीचे सदस्य महेंद्र शिंदे, तानाजी ढाले, अमोल गावडे, दौलत पाटील, संपत देसाई, सुदाम इंगवले, बाळासो गायकवाड, सौ.कविता सुर्यवंशी, संदेश भोसले आदी उपस्थित होते.