राजकारणात होणार मोठी उलथापालथ! ठाकरे, शरद पवार भाजपसोबत जाणार तर शिंदे अजितदादा…..

माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मोठा दावा केला आहे. त्यांच्या या दाव्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. देशात जी काही मोठी राजकीय उलथापालथ होणार आहे, ती शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबाबत आहे.शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे केंद्रात लवकरच भाजपसोबत जाताना दिसतील असा मोठा दावा बच्चू कडू यांनी केला आहे. बच्चू कडू यांच्या या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे. देशात जी काही मोठी राजकीय उलथापालथ होणार आहे, ती शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबाबत आहे.

शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे केंद्रात लवकरच भाजपसोबत जाताना दिसतील, असा दावा बच्चू कडू यांच्याकडून करण्यात आला आहे. ते पुढे बोलताना म्हणाले की ज्या पद्धतीने नीतीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू हे एक दोन बिल पास करण्यासाठी भाजपसोबत थांबले आहेत ते गेल्यानंतरची सोय सध्या भाजप बघत असून, यामध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांचा शिवसेना ठाकरे गट यांच्याकडे असणाऱ्या खासदारांची संख्या पाहाता संजय राऊत यांनी केलेलं वक्तव्य देखील हेच दाखवत आहे . आता पुन्हा आपल्याकडे सत्ता येणार असल्याने कोणी पक्ष सोडून जाऊ नये हाच राऊत यांचा प्रयत्न आहे , असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.