काकांशी दुरावा मात्र जयंतरावांशी गुप्तगू…..

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये २०२३  मध्ये उभी फूट पडली आणि शरद पवार व अजित पवार असे दोन गट निर्माण झाले. पक्षफुटीनंतर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने राष्ट्रवादीतील या दोन्ही गटांमध्ये टोकाचा राजकीय संघर्ष आणि आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही झडल्या, मात्र आता विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमधील वातावरण काहीसं निवळत असून दोन्ही बाजूचे नेते एकमेकांच्या भेटीगाठी घेऊ लागले आहेत. काही दिवसांपूर्वी बारामती येथील कृषी प्रदर्शनाच्या निमित्ताने एका मंचावर आलेले पवार काका-पुतण्या गुरुवारी पुन्हा एकदा पुण्यातील कार्यक्रमात एकत्र दिसले.

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची ४७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि पारितोषिक वितरण समारंभाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण पवार कुटुंबिय मंचावर होते. अजित पवारांनी खुर्ची बदलत शरद पवारांशी दुरावा दाखविला, तथापि पक्षफुटीनंतर आरोप -प्रत्यारोप केलेले नेते जयंतराव पाटील आणि अजित पवार हे दोघे मात्र शरद पवारांचे भाषण चालू असतानाच मागे हसत खेळत गप्पा मारत होते. या समारंभाच्या निमित्ताने दुभंगलेल्या राष्ट्रवादीचे विविध नेते पहिल्यांदाच मोठ्या संख्येने एकाच मंचावर आल्याचे पाहायला मिळाले.

राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या काका-पुतण्यासह जयंतराव पाटील, दिलीप वळसे पाटील, हर्षवर्धन पाटील, अशोक पवार आदी मान्यवरांची या कार्यक्रमाला उपस्थिती  होती. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटकडून शरद पवार यांच्या हस्ते चांगली कामगिरी करणाऱ्या शेतकरी आणि साखर कारखान्यांना पुरस्कारदेण्यात आले. तसेच संस्थेकडून पारितोषिकाच्या रकमेतही करण्यात आली. या कार्यक्रमात शरद यांचे भाषण सुरू असताना पवार  अजित पवार आणि जयंतराव पाटील  या दोन जुन्या सहकाऱ्यांमध्ये बऱ्याच वेळ दिलखुलास संवाद रंगल्याने सर्वांचेच लक्ष वेधले गेले.